पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हा प्रवास सुंदर आहे……

इमेज
                           अभंग पुस्तकालय, नांदेड या आमच्या उपक्रमास यंदाच्या गुढी पाडव्यास १७ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आमच्या प्रवासाचे सिहांवलोकन!     ग्रंथविक्री हा संकुचित उद्देश ठेवता, वाचनसंस्कृती संवर्धन व संस्कृतिक चळवळ सुरु करणे हा आमचा मानस होता. मनांत एक खंत होती, १९५५-१९७५ या कालावधीतला सुवर्णकाळ ओसरुन गेला होता. कुरुंदकर गुरुजी, शेवाळकर, प्राचार्य बारलिंगे, प्रा.शिरवाडकर, स.रा.गाडगीळ, वे.शा.सं.कस्तूरे, इतिहासाचार्य कानोले, चित्रमहर्षी वसेकर, गानतपस्वी गुंजकर अशी दिग्ग्ज सारस्वतांची मांदियाळी ओसरली होती. साहित्य संस्कृतिक क्षेत्राला आलेली मरगळ वेदनादायी होती. पण कुठल्याही प्रकारचा तक्रारीचा सूर आळवत बसण्यापेक्षा आम्ही प्रत्यक्ष कृतीला सुरवात केली. बिरबलाच्या गोष्टी प्रमाणे आधीच्या सांस्कृतिक रेषेपुढे आम्ही 'अभंग पुस्तकालयाची' रेष ओढली, जिच्यामुळे नांदेडचे सांस्कृतिक वैभव वापस यायला सुरवात झाली. जेष्ठ पत्रकार व संपादक सुधाकरराव डोईफोडे यांनी 'अभंग' शिर्षकाच्या त्यांच्या अग्रलेखातही (द...