हा प्रवास सुंदर आहे…..
श्यामची आई-माझ्या घरी 'अभंग पुस्तकालया'च्या 'श्यामची आई-माझ्या घरी ' ह्या अभिनव उपक्रमास प्रारंभीच आदरणीय ग.प्र.प्रधान यांनी पाठराखण करुन आमचा उत्साह वाढवला होता. या निमित्ताने त्यांची अनौपचारिक झालेली भेट ही मार्गदर्शक होती. प्रधान मास्तरांनी उपक्रमाच्या माहिती पुस्तिकेस शुभेच्छा संदेश दिला व देणगी देऊन आशीर्वादही दिला होता.तसेच सदर उपक्रमास त्या वेळी माननीय शरद पवार, साधनाताई आमटे, डॅा.शशीकला जोशी,'सर्च'चे डॉ.राणी व डॉ.अभय बंग, कवयित्री सुनेत्रा ओक, पुणे विदयार्थी गृहाचे रामचंद्र शेटे यांनीही शुभेच्छा पाठवल्या तर अनेक जणांनी सक्रिय सहभाग नोंदवत आम्हाला बळ दिले. 'श्यामची आई-माझ्या घरी' या उपक्रमाच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन तत्कालीन जिल्हाधिकारी राधेश्याम मोपलवार,जेष्ठ पत्रकार व संपादक सुधाकरराव डोईफोडे यांच्या हस्ते दि.२७ एप्रील २००७ रोजी करण्यांत आले.दोघांनीही 'श्यामची आई' पुस्तकातील संस्कारमूल्यांच्या प्रसाराचे मह-त्व विषद केले आणि उपक्रमास शुभेच्छा दिल्या. ...