हा प्रवास सुंदर आहे….
साने गुरुजीं च्या 'श्यामची आई' पुस्तकातील नैतिकमूल्ये आज एकविसाव्या शतकात दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ११ जून साने गुरुजींचा स्मृती दिवस! त्यांच्या स्मृतीस अभिवादन. साने गुरुजींनी आपले सर्व लेखनसमाजोध्दारार्थ लिहिले.त्यांच्या मनात राजकीय,सामाजिक व शैक्षणिक विषयाच्या अनुषंगाने जे जे विचारांचे,भावनांचे कल्लोळ उठले ते ते सर्व लेखणीच्या व्दारे प्रकट केले.या विपूल साहित्य् सागरातील तेजस्वी रत्नं म्हणजे 'श्यामची आई' हे पुस्तक मला आठवतं मी सहावीत असतांना 'श्यामची आई' हे साने गुरुजींचे पुस्तक वाचले होते. आचार्य अत्रे यांनी म्हटल्या प्रमाणे हे 'मातृप्रेमाचे स्त्रोत्र' वाचुन त्या क्षणी भारावल्यासारखे झाले होते.या पुस्तकातील गोष्टी मनांत कुठेतरी रुजल्या आणि साने गुरुजी हळवा कोपरा! कालांतराने आमचा मुलगा आदित्य् याला गोष्टी वाचून दाखवतांना 'श्यामची आई' हे साने गुरुजींचे पुस्तक मला परत भेटले.पण या वेळी या पुस्तकाचे नवीन पैलू जाणवले. हे पुस्तक म्हणजे भारतीय संस्कृतीचे उदात्त् चित्रण आणि नैतिक मूल्यांचे मार्गदर्शन करणारी मार्गदर्शीका वाटली.माझ्याबाब...