हा प्रवास सुंदर आहे……
'वाचन कट्टा'; वाचनसंस्कृती संवर्धानाचा 'अभंग' वारसा अगोदर हैदराबाद संस्थानात आणि नंतर मराठवाडयात अनुक्रमे आ.कृ.वाघमारे आणि अनंतराव भालेराव यांनी ध्येयवादी पत्रकारतेची मुहूर्तमेढ रोवली.सुधाकरराव डोईफोडे हे नंतरच्या पिढीचे प्रतिनिधी. सुधाकरराव डोईफोडे यांनी आपले मित्र रामेश्वर बियाणी व डॉ.नंदकुमार देव यांच्या सहकार्याने 'प्रजावाणी' हे दैनिेक सुरु करुन पुढील काळात नावारुपाला आणले.आज हे दैनिक आपले हीरकमहोत्सवी वाटचाल करत आहे. मराठवाडयात भूमिपत्र म्हणून ज्या दोन वृत्तपत्रांना समाजमान्यता मिळाली, त्यात एक होते 'मराठवाडा' आणि दुसरे 'प्रजावाणी' 'दिन-पीडितांना अंतर देऊ नये, जुलमी मंदांधंची गय करु नये' हे ब्रीदवाक्य या दैनिकाने सर्वार्थाने अंगिकारले.इतिहास, पराराष्ट्रसंबंध ,संरक्षण,भौगोलिक परिस्थिती आणि मराठवाडयाचे प्रश्न हे सुधाकरराव डोईफोडे यांचे आवडीचे विषय होते.यावर त्यांनी अभ्यासपूर्ण लेख आणि अग्रलेख लिहिले.गोविंदभाई श्रॉफ यांच्या नंतर रेल्वे प्रश्नाचे जाणकार म्हणून सुधाकररावांचे नाव घ्यावे लागेल.रेल्वेप्रश्नावरही त्यांना विविध वृत...