पोस्ट्स

हा प्रवास सुंदर आहे……

इमेज
    तोच मी     प्रभाकर पणशीकर! मराठी नाटयसृष्टीतील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व.प्रभाकर पणशीकर नाटयवर्तुळात 'पंत' या नावाने ओळखले जात. १४ मार्च हा पंतांचा जन्मदिवस. त्या दिवशी प्रसारमाध्यमांनी या नटवर्याची दखल घेतलेली दिसली नाही. राजहंस प्रकाशनाच्या 'तोच मी'या आत्मचरित्राच्या जाहिरातीत मात्र आर्वजून उल्लेख होता. या निमित्ताने प्रभाकर पणशीकरांच्या आठवणी ताज्या झाल्या.अशा नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांचे तीन कार्यक्रम घेण्याचा बहुमान नांदेड च्या 'अभंग पुस्तकालया'ला मिळाला.पहिल्या भेटीतच आमचे पंतांशी सूर जुळले.     'नाटयसंपदा' नावाची नाटयसंस्था स्थापन करुन प्रभाकर पणशीकरांनी अनेक दर्जेदार अशा ४१ नाटकांची निर्मिती केली. १९६३ ते १९९९ दरम्यान एक निर्माता, दिग्दर्शक व नट म्हणून प्रभाकर पंतांनी मराठी नाटयसृष्टी अक्षश: गाजवली. 'अश्रुंची झाली फुले', 'कटयार काळजात घुसली' आणि 'संत तुकाराम' ही तीन नाटकं एकाच दिवशी तीन नाटयगृहात लावण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आजही आहे.   प्रारंभी वयाच्या ऐन पंचवीशीत मो.ग. रांगणेकर यांच्या 'नाटयनिकेतन' या ...

हा प्रवास सुंदर आहे……

इमेज
    बंग आणि अभंग              ‘ नव्याने शोधताना ’ हे माझी मैत्रिण डॉ . मीरा कुलकर्णी हिचे पहिले पुस्तक आणि अभंग प्रकाशनाचे पहिले प्रकाशन .        अगणित शब्दांमधून आणि अमर्याद रेषांसोबत काही नवीन शोधायचा प्रयत्न मीरासोबत आम्ही पण केला . शब्दांच्या सोबतीने चालताना मीराने मनातील सुखदुखा : ची ओझी मनांवर वागवली नाहीत . त्यामुळे या प्रवासाची जणू आनंदयात्रा झाली .        या पुस्तकास डॉ . अभय बंग यांची प्रस्तावना हवी हा मीराचा आग्रह तर ‘ अभंग पुस्तकालयाचे ’ औपचारिक उद्घाटन व मीराच्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्तेच व्हावे , ही आमची विनंती .      आम्हां उभयतांसाठी डॉ . अभय बंग हे श्रद्धास्थानी . खरच आठवतं अनिल अवचटांच्या ’ कार्यरत ’ मधून त्यांची ओळख झाली तेव्हा आम्ही झपाटल्यासारखे झालो , मग त्यांच्याविषयीची माहिती शोधतच गेलो . त्याचदरम्यान डॉक्टरांचे ‘ माझा साक्षात्कारी - हृदयरोग ’( राजहंस प्रकाशन ) हे...