हा प्रवास सुंदर आहे……

 

  बंग आणि अभंग  

        नव्याने शोधतानाहे माझी मैत्रिण डॉ.मीरा कुलकर्णी हिचे पहिले पुस्तक आणि अभंग प्रकाशनाचे पहिले प्रकाशन.
      अगणित शब्दांमधून आणि अमर्याद रेषांसोबत काही नवीन शोधायचा प्रयत्न मीरासोबत आम्ही पण केला. शब्दांच्या सोबतीने चालताना मीराने मनातील सुखदुखा:ची ओझी मनांवर वागवली नाहीत. त्यामुळे या प्रवासाची जणू आनंदयात्रा झाली.
      या पुस्तकास डॉ.अभय बंग यांची प्रस्तावना हवी हा मीराचा आग्रह तरअभंग पुस्तकालयाचेऔपचारिक उद्घाटन मीराच्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्तेच व्हावे, ही आमची विनंती.



     आम्हां उभयतांसाठी डॉ.अभय बंग हे श्रद्धास्थानी. खरच आठवतं अनिल अवचटांच्याकार्यरतमधून त्यांची ओळख झाली तेव्हा आम्ही झपाटल्यासारखे झालो, मग त्यांच्याविषयीची माहिती शोधतच गेलो. त्याचदरम्यान डॉक्टरांचेमाझा साक्षात्कारी-हृदयरोग’(राजहंस प्रकाशन) हे पुस्तक वाचण्यात आले आणि झटका बसावा तसे झाले. आज-हृदयविकाराचे वाढलेले प्रमाण हे चिंताजनक आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण आत्मकेंद्री प्रवृत्ती यामुळे प्रत्येकाचे जीवन संकुचित होवून गेले आहे. प्रत्येक माणूस मी, मला, माझे या दुष्टचक्रात अडकल्याने जीवनाचा खरा अर्थच हरवून बसला आहे. सतत यशस्वी होण्याच्या ध्यासाने मानसिक ताणाखाली वावरतो, पर्यायाने-हृदयविकाराला आमंत्रित करतो. या पुस्तकाने महाराष्ट्राच्या-हृदयाला जीवनशैलीला हात घातला.
      आमचे औरंगाबाद येथील स्नेही श्याम देशपांडे (ते राजहंस प्रकाशनाचे विभागीय प्रतिनिधी होते.) यांच्या मदतीने डॉ.अभय बंग यांचे व्याख्यान निश्चित झाले. ती आमची पहिली भेट. या भेटीत डॉक्टरांशी आमचे अनुबंध जुळले आणि आम्हाला त्यांनी त्यांच्यासर्चपरिवारात सामावून घेतले. त्यानंतर ते आमच्या प्रेमाखातरअभंग पुस्तकालयाच्या कार्यक्रमाला वारंवार येतच आहेत.



      वास्तविक २००१ सालातील डॉ.अभय बंग यांचे अनंत भालेराव व्याख्यानमालेतील हदयरोग आणि जीवनशैलीया विषयावरचे म्हणजे आत्मपरिक्षणात्मक चिंतनशील व्याख्यान म्हणजे एका आदर्श जीवनशैलीची मार्गदर्शिकाच होती. नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास नांदेडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला, सभागृह पूर्णत: भरुन गेले. डॉ.अभय बंग यांच्या सूचनेनुसार काही श्रोत्यांना व्यासपीठावर बसविण्यात आले. त्यादिवशी वक्ता, व्यासपीठ श्रोता जणू एकमेकांत मिसळून गेले होते. जवळपास दोन तास चाललेल्या कार्यक्रमात डॉक्टरांनी आपल्या सहज, सोप्या भाषणातून सभागृहाला मंत्रमुग्ध केले. चालण्याच्या शास्त्रशुध्द पध्दतीचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. समतोल आहाराचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी डॉ.अभय बंग यांच्यामाझा साक्षात्कारी-हृदयरोग’ (राजहंस प्रकाशन) या पुस्तकाच्या ३०० प्रती विकल्या  गेल्या. जणू अभंग पुस्तकालयाची ती मुहूर्तमेढच रोवली गेली. कारण सदर कार्यक्रमदर्पण प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात आला होता. एव्हाना वरील पुस्तकाच्या २४ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. पुढील काळात २५वी आवृत्ती निघाल्यानंतर तिचे प्रकाशन नांदेडमध्ये करण्याचा आमचा मानस आहे.
      डॉ.अभय बंग यांनी व्याख्यानादरम्यान - हृदयरोग टाळण्यासाठीची सप्तसूत्री सांगितली :- 
. फॅट कमी फायबर जास्ती 
. फळे भाज्या 
.नो फास्ट फूड 
.रोज चालणे योगासन
.प्राणायाम-ध्यान 
.प्रेम करा 
.जगण्यासाठी सक्रिय करुणा शोधा
अशा पध्दतीने  प्रत्येकाने निरोगी जीवनशैली निर्माण करावी, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.



     या व्याख्यानानंतर नांदेडमधील नागरिक आरोग्याबाबत तसेच सकाळी चालण्याच्या बाबतीत सतर्क झालेले दिसून आले. याचे श्रेय अर्थात डॉ.अभय बंग यांना जाते!
       ‘
नव्याने शोधतानाया डॉ.मीरा कुलकर्णी हिच्या पुस्तकास डॉ.अभय बंग यांनी अप्रतिम प्रस्तावना लिहिली. ते लिहितात.‘नव्याने शोधतानावाचणे हा एक अंर्तमुख करणरा अनुभव आहे. मीरासोबत आपणही जीवनाचे अर्थ नव्याने शोधायला लागतो. लेखिका डॉ.मीरा कुलकर्णी या एका व्यक्तीमध्ये अनेक व्यक्तीत्व सामावलेली आहेत. यामार्फत लेखिका आपल्याला जीवनाचे दर्शन घडविते. जगाकडे तिचं बघणं स्त्री-हृदयाच्या डोळ्यांतून आहे. ती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर आहे. कोणत्याही लेखकापेक्षा अधिक जवळून स्त्री-हृदयाचे दर्शन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरला होऊ शकतं. फक्त ते अनुभवायला संवेदनशील-हृदय पाहिजे. मीराजवळ ते विपूल प्रमाणात आहे. अशा दोन्ही माध्यमांचा संगम तिच्या लेखनशैलीत प्रकट होतो. वस्तुत: ती चित्ररुपाने जग बघते शब्दरुपीने प्रकट करते. लेखिकेच्या या विविध रुपांसोबतच एक रुप आहे चिंतकाचं. एक छोटा तत्वज्ञ मीराच्या मनात दडून बसला आहे. तो जीवनाचं दर्शन घडवतो. डॉ.अभय बंग यांची पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखवणारी प्रस्तावना म्हणजे पुस्तकाच्या शिरेपोचातील मुकुटमणी आहे.
      
नव्याने शोधतानाया पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मार्च २००९ रोजी नांदेडच्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन जिल्हाधिकारी राधेश्याम मोपलवार होते. त्यांनी आपल्या भाषणात वरील पुस्तकाचे उत्तम रसग्रहण केले. या सोहळ्यात डॉ.अभय बंग यांचेसेवाग्राम ते शोधग्रामया विषयावर चिंतनशील भाषण झाले.



     भारत सरकारने डॉ.अभय बंग डॉ.राणी बंग यांच्या असामान्य समाजसेवेची दखल घेत २०१८ साली पद्मश्री हा सर्वोच्च बहुमान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. पती-पत्नीला एकत्रित गौरवण्याची ही पहिलीच वेळ होती.
      या निमित्ताने आम्हीअभंग पुस्तकालयाच्यावतीने उभयतांचा नागरी सत्कार करण्याचे ठरवले. डॉ.अभय बंग डॉ.राणी बंग दोघेही एकत्रसर्चसोडत नाहीत. एक जण तिथे राहून तेथील व्यवस्था पाहतात; परंतु केवळ आम्हा उभयतांवरील प्रेमामुळे ते दोघेही नांदेडला आले. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांच्या हस्ते पद्मश्री डॉ.अभय डॉ.राणी बंग यांचा सत्कार करण्यात आला. सौहार्दपूर्ण वातावरणात झालेला हा कार्यक्रम संस्मरणीय झाला. त्यानंतर १३ ऑगस्ट २०१९ रोजी न्या.चपळगावकरांच्याअनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्वयाअभंगच्या पुस्तकाचे प्रकाशन औरंगाबादेत झाले. प्रमुख पाहुणे होते अर्थातच डॉ.अभय बंग. हा कार्यक्रम म्हणजे भालेरावप्रेमींचीमांदियाळी’. डॉ.बंग यांनी आपल्या सव्वा तासाच्या भाषणाने श्रोत्यांना खिळवून ठेवले.
      डॉ.रघुनाथ भास्कर भागवत म्हणजेच आर.बी.भागवत यांचा पहिला स्मृतिदिन २४ जानेवारी रोजी होता. त्यानंतर २१ दिवसांनी म्हणजे १२ फेब्रुवारी २०२३ रोजी वैद्यकीय शिक्षणक्षेत्रासाठी ज्ञानदान आणि अचूक निदानानिशी रुग्णोपचार यांत आपले जीवन समर्पित करणार्या या तपस्वी, ऋषितुल्य गुरुवर्यांवरील स्मृतिलेखांचाध्यासपंथी धन्वंतरीहा २५० पानी ग्रंथ औरंगाबादेत प्रकाशित झाला. औरंगाबाद येथे भव्य वाचकार्पण सोहळा झाला. त्यासाठी पद्मश्री डॉ.अभय बंग, पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर आणि डॉ.संजय ओक हे सुपरिचित वक्ते एका व्यासपीठावर आले होते.
      मेडिसीन क्षेत्रातील भिष्म पितामहास अभिवंदन करण्यासाठी डॉ.अभय बंग आमच्या विनंतीला मान देऊन खास औरंगाबादला आले. आमच्यासाठी ही गौरवाची गोष्ट आहे. आम्ही घेतलेला त्यांचा हा पाचवा कार्यक्रम. ‘संजूनी बोलवलं की, यावेच लागते’, ही डॉक्टरांची प्रेमळ तक्रार सुखावून जाते. बंग आणिअभंगयांचा गेल्या २२ वर्षांतला हा ऋणानुबंध आमच्यासाठी मोलाचा ठेवा झाला आहे.
     या क्षणी जपानी तत्वज्ञानावर आधारित एक पुस्तक आठवते. जीवन जगताना प्रत्येकाचा एकईकिगाईअसतो. मनात आले, डॉ.अभय बंग हे आमचेईकिगाई आहेत.

-                -       नीमा कुलकर्णी.- माे.नं- ९९२३५९२२४७

·         *  छायाचित्रे- सौजन्य होकर्णे बंधु नांदेड.

 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हा प्रवास सुंदर आहे….

हा प्रवास सुंदर आहे….

हा प्रवास सुंदर आहे……