पोस्ट्स

हा प्रवास सुंदर आहे……

इमेज
                       मराठवाड्याच्या ध्वजस्तंभास ‘अभंग’ची मानवंदना! (१) हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा लेखक - अनंत भालेराव या ग्रंथाची पाचवी आवृत्ती. हैदराबाद संस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा संग्राम झाला होता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, तरी हैदराबाद संस्थानात समाविष्ट असलेल्या भागाच्या स्वातंत्र्यासाठी त्यानंतर तब्बल १३ महिने संघर्ष करावा लागला होता. सन १९४८ साली सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पोलिस कारवाई सुरू झाली आणि १७ सप्टेंबर रोजी हैदराबाद संस्थान निजामी राजवटीतून मुक्त झाले. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यावरच भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पुर्णत्व मिळाले. या ऐतिहासिक स्वातंत्र्याचे 'अमृतमहोत्सवी वर्ष' 17 सप्टेंबर रोजी संपत आहे. या निमित्ताने अनंत भालेराव लिखित वरील ग्रंथाची पाचवी आवृत्ती जुन्या व नव्या पिढीतील वाचकांसाठी उपलब्ध झाली आहे. तत्कालीन हैदराबाद संस्थानात तेलंगणा आणि कर्नाटकच्या भागासह मराठवाडा विभागाचा समावेश होता. निजामी राजवटीविरुद्धच्या निकराच्या लढाईत मराठवाड्याने लक्षणीय योगदान दिले. त्याग, बलिदान आणि हालअपेष्टा सोसण्य

हा प्रवास सुंदर आहे……

इमेज
        'वाचन कट्टा'; वाचनसंस्कृती संवर्धानाचा 'अभंग' वारसा अगोदर हैदराबाद संस्थानात आणि नंतर मराठवाडयात अनुक्रमे आ.कृ.वाघमारे आणि अनंतराव भालेराव यांनी ध्येयवादी पत्रकारतेची मुहूर्तमेढ रोवली.सुधाकरराव डोईफोडे हे नंतरच्या पिढीचे प्रतिनिधी. सुधाकरराव डोईफोडे यांनी आपले मित्र   रामेश्वर बियाणी व डॉ.नंदकुमार देव यांच्या सहकार्याने 'प्रजावाणी' हे दैनिेक सुरु करुन पुढील काळात नावारुपाला आणले.आज हे दैनिक आपले हीरकमहोत्सवी वाटचाल करत आहे. मराठवाडयात भूमिपत्र म्हणून ज्या दोन वृत्तपत्रांना समाजमान्यता मिळाली, त्यात एक होते 'मराठवाडा' आणि दुसरे 'प्रजावाणी' 'दिन-पीडितांना अंतर देऊ नये, जुलमी मंदांधंची गय करु नये' हे ब्रीदवाक्य या दैनिकाने सर्वार्थाने अंगिकारले.इतिहास, पराराष्ट्रसंबंध ,संरक्षण,भौगोलिक परिस्थिती आणि मराठवाडयाचे प्रश्न हे सुधाकरराव डोईफोडे यांचे आवडीचे विषय होते.यावर त्यांनी अभ्यासपूर्ण लेख आणि अग्रलेख लिहिले.गोविंदभाई श्रॉफ यांच्या नंतर रेल्वे प्रश्नाचे जाणकार म्हणून सुधाकररावांचे नाव घ्यावे लागेल.रेल्वेप्रश्नावरही त्यांना विविध वृत

हा प्रवास सुंदर आहे….

इमेज
  साने गुरुजीं च्या 'श्यामची आई' पुस्तकातील नैतिकमूल्ये     आज एकविसाव्या शतकात दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ११ जून साने गुरुजींचा स्मृती दिवस! त्यांच्या स्मृतीस अभिवादन.   साने गुरुजींनी आपले सर्व लेखनसमाजोध्दारार्थ लिहिले.त्यांच्या मनात राजकीय,सामाजिक व शैक्षणिक विषयाच्या अनुषंगाने जे जे विचारांचे,भावनांचे कल्लोळ उठले ते ते सर्व लेखणीच्या व्दारे प्रकट केले.या विपूल साहित्य् सागरातील तेजस्वी रत्नं म्हणजे 'श्यामची आई' हे पुस्तक मला आठवतं मी सहावीत असतांना 'श्यामची आई' हे साने गुरुजींचे पुस्तक वाचले होते. आचार्य अत्रे यांनी म्हटल्या प्रमाणे हे 'मातृप्रेमाचे स्त्रोत्र' वाचुन त्या क्षणी भारावल्यासारखे झाले होते.या पुस्तकातील गोष्टी मनांत कुठेतरी रुजल्या आणि साने गुरुजी हळवा कोपरा! कालांतराने आमचा मुलगा आदित्य् याला गोष्टी वाचून दाखवतांना 'श्यामची आई' हे साने गुरुजींचे पुस्तक मला परत भेटले.पण या वेळी या पुस्तकाचे नवीन पैलू जाणवले.   हे पुस्तक म्हणजे भारतीय संस्कृतीचे उदात्त् चित्रण आणि नैतिक मूल्यांचे मार्गदर्शन करणारी मार्गदर्शीका वाटली.माझ्याबाब

हा प्रवास सुंदर आहे….

इमेज
                "मैत्र जीवाचे" छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे दि.११ व १२ मे २०२३ रोजी 'जिगीषा' या नाटयसंस्थेला ४० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे वर्धापन दिन व आम्हा मित्र मैत्रिणींचा स्नेह मेळावा (गेट टुगेदर) संपन्न् होतो आहे.या निमित्ताने हे मनोगत. 'जिगीषा' शी आपले एक खास नाते आहे आणि त्यातूनच आपला सांस्कृतिक पिंड जोपासला गेला, हे आवर्जून सांगावेसे वाटते.आज मी जरी लेख लिहित असले तरी, लेखातील भावना आमच्या 'स्त्री' मधील प्रत्येकीची आहे.आमच्या 'फ्रेंड्स, फिलोसॉफर व गाईड' प्रशांत,चंदूने अर्थात 'जिगीषा' ने आम्हाला जे दिले तेच आज आमच्या प्रत्येकीच्या कृतार्थ जीवनाचे संचीत आहे. आज ख्यातनाम नाटय व चित्रपट लेखक प्रशांत दळवी व प्रतिभावान दिग्दर्शक चंद्रकांत कुळकर्णी म्हणून ते मराठी नाटय-चित्रपट क्षेत्रात प्रसिध्द आहेत.याचा सार्थ अभिमान व कौतुक आम्हाला आहेच; नितांत आदरही आहे,पण तरीही ते आमच्या साठी प्रशांत, चंदूच आहेत.मैत्रीत कोणत्याही उपचारांची गरज आम्हाला वाटत नाही. औरंगाबादेत मधे १९८२-८३ च्या कालावधीत सुमारे वीस पंचवीस जणांचा आमचा