पोस्ट्स

हा प्रवास सुंदर आहे….

इमेज
  साने गुरुजीं च्या 'श्यामची आई' पुस्तकातील नैतिकमूल्ये     आज एकविसाव्या शतकात दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ११ जून साने गुरुजींचा स्मृती दिवस! त्यांच्या स्मृतीस अभिवादन.   साने गुरुजींनी आपले सर्व लेखनसमाजोध्दारार्थ लिहिले.त्यांच्या मनात राजकीय,सामाजिक व शैक्षणिक विषयाच्या अनुषंगाने जे जे विचारांचे,भावनांचे कल्लोळ उठले ते ते सर्व लेखणीच्या व्दारे प्रकट केले.या विपूल साहित्य् सागरातील तेजस्वी रत्नं म्हणजे 'श्यामची आई' हे पुस्तक मला आठवतं मी सहावीत असतांना 'श्यामची आई' हे साने गुरुजींचे पुस्तक वाचले होते. आचार्य अत्रे यांनी म्हटल्या प्रमाणे हे 'मातृप्रेमाचे स्त्रोत्र' वाचुन त्या क्षणी भारावल्यासारखे झाले होते.या पुस्तकातील गोष्टी मनांत कुठेतरी रुजल्या आणि साने गुरुजी हळवा कोपरा! कालांतराने आमचा मुलगा आदित्य् याला गोष्टी वाचून दाखवतांना 'श्यामची आई' हे साने गुरुजींचे पुस्तक मला परत भेटले.पण या वेळी या पुस्तकाचे नवीन पैलू जाणवले.   हे पुस्तक म्हणजे भारतीय संस्कृतीचे उदात्त् चित्रण आणि नैतिक मूल्यांचे मार्गदर्शन करणारी मार्गदर्शीका वाटली.माझ्याबाब...

हा प्रवास सुंदर आहे….

इमेज
                "मैत्र जीवाचे" छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे दि.११ व १२ मे २०२३ रोजी 'जिगीषा' या नाटयसंस्थेला ४० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे वर्धापन दिन व आम्हा मित्र मैत्रिणींचा स्नेह मेळावा (गेट टुगेदर) संपन्न् होतो आहे.या निमित्ताने हे मनोगत. 'जिगीषा' शी आपले एक खास नाते आहे आणि त्यातूनच आपला सांस्कृतिक पिंड जोपासला गेला, हे आवर्जून सांगावेसे वाटते.आज मी जरी लेख लिहित असले तरी, लेखातील भावना आमच्या 'स्त्री' मधील प्रत्येकीची आहे.आमच्या 'फ्रेंड्स, फिलोसॉफर व गाईड' प्रशांत,चंदूने अर्थात 'जिगीषा' ने आम्हाला जे दिले तेच आज आमच्या प्रत्येकीच्या कृतार्थ जीवनाचे संचीत आहे. आज ख्यातनाम नाटय व चित्रपट लेखक प्रशांत दळवी व प्रतिभावान दिग्दर्शक चंद्रकांत कुळकर्णी म्हणून ते मराठी नाटय-चित्रपट क्षेत्रात प्रसिध्द आहेत.याचा सार्थ अभिमान व कौतुक आम्हाला आहेच; नितांत आदरही आहे,पण तरीही ते आमच्या साठी प्रशांत, चंदूच आहेत.मैत्रीत कोणत्याही उपचारांची गरज आम्हाला वाटत नाही. औरंगाबादेत मधे १९८२-८३ च्या कालावधीत सुमारे वीस पंचवीस जणा...

हा प्रवास सुंदर आहे……

इमेज
  जागर साहित्याचा, उत्सव मैत्रीचा!     सुप्रसिध्द लेखिका व कवयित्री शुभांगी मांडे-खारकर हिच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन व षष्ठब्दीपूर्ती सोहळा दि.२ एप्रिल २०२३ रोजी अंबर हॉल कोथरुड पुणे येथे पार पडला.या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे,दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी व प्रतिमा जोशी लेखिका शुभांगी मांडे- खारकर यांची उपस्थिती होती.      याप्रसंगी तिनही पाहूण्यांची पुस्तकावर भाष्य करणारी समायोचित भाषणे झाली.लेखिका शुभांगी मांडे-खारकर हिचे भावपूर्ण मनोगत झाले.शुभाच्या मुली नेहा,मोनिका,व जावई हर्षद,ऋषिकेश यांच्या पुढाकारातून झालेला हा कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात नातेवाईक,मित्रमैत्रिणी यांच्या उपस्थितीत पार पडला.सदर कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन नेहा मांडे हिने केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभाने  नातेवाईक व  'जिगीषा'चा स्नेह मेळावाच घडवून आणला.शुभाच्या प्रेमामुळे आम्ही सर्व प्रशांत दळवी, चंदकांत कुळकर्णी,प्रतिमा व अभय जोशी,ऊर्मिला व दिलीप काळे,मनीषा व मिलींद जोशी,नंदु माधव,संध्या व विवेक पत्की,संगीता कु...

हा प्रवास सुंदर आहे……

इमेज
      'वसुंधरेचे शोधयात्री' चे प्रकाशन आणि पुस्तकाचे अंतरंग भूगोलासारख्या महत्त्वाच्या विषयाबाबत असलेले अज्ञान हा आपला दोष आहे. त्या अज्ञानाची बीजे अजूनही आपल्या रक्तात आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. अनुराग लव्हेकर यांनी लिहिलेले 'वसुंधरेचे शोधयात्री' हे पुस्तक महत्वाचे असून, भुगोलाचा इतिहास माहीत नाही अशांना हा इतिहास कळावा यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक तथा चतुरस्त्र लेखक गिरीश कुबेर यांनी येथे केले. नांदेड येथील पचनसंस्था विकारतज्ञ डॉ. अनुराग लव्हेकर यांनी पृथ्वी धुंडाळणाऱ्या शोध नायकांची विखुरलेली माहिती संकलित करुन लिहिलेल्या 'वसुंधरेचे शोधयात्री' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि. ७ मार्च रोजी नांदेडच्या शंकरराव चव्हाण नियोजन भवनात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून 'भुगोलकोश'कार एल. के. कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, लेखक डॉ. अनुराग व डॉ. अमरजा लव्हेकर यांची उपस्थिती होती. यावेळी गिरीश कुबेर यांनी भुगोलाचे महत्त्व अधोरेखित केले. भुगोलाचे ज्ञान नसण्याचे परिणाम खूप गंभीर आहेत. या अज्ञानाची...

हा प्रवास सुंदर आहे……

इमेज
    तोच मी     प्रभाकर पणशीकर! मराठी नाटयसृष्टीतील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व.प्रभाकर पणशीकर नाटयवर्तुळात 'पंत' या नावाने ओळखले जात. १४ मार्च हा पंतांचा जन्मदिवस. त्या दिवशी प्रसारमाध्यमांनी या नटवर्याची दखल घेतलेली दिसली नाही. राजहंस प्रकाशनाच्या 'तोच मी'या आत्मचरित्राच्या जाहिरातीत मात्र आर्वजून उल्लेख होता. या निमित्ताने प्रभाकर पणशीकरांच्या आठवणी ताज्या झाल्या.अशा नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांचे तीन कार्यक्रम घेण्याचा बहुमान नांदेड च्या 'अभंग पुस्तकालया'ला मिळाला.पहिल्या भेटीतच आमचे पंतांशी सूर जुळले.     'नाटयसंपदा' नावाची नाटयसंस्था स्थापन करुन प्रभाकर पणशीकरांनी अनेक दर्जेदार अशा ४१ नाटकांची निर्मिती केली. १९६३ ते १९९९ दरम्यान एक निर्माता, दिग्दर्शक व नट म्हणून प्रभाकर पंतांनी मराठी नाटयसृष्टी अक्षश: गाजवली. 'अश्रुंची झाली फुले', 'कटयार काळजात घुसली' आणि 'संत तुकाराम' ही तीन नाटकं एकाच दिवशी तीन नाटयगृहात लावण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आजही आहे.   प्रारंभी वयाच्या ऐन पंचवीशीत मो.ग. रांगणेकर यांच्या 'नाटयनिकेतन' या ...